Ad will apear here
Next
प्रादेशिक भाषांच्या अभ्यासाकरिता सायकलवरून भारतभ्रमण
दापोली : देशभरातील प्रादेशिक भाषा अर्थात त्या त्या ठिकाणच्या नागरिकांच्या मातृभाषा या विषयावर अभ्यास करण्यासाठी डोंबिवलीचे गंधार कुलकर्णी सायकलवरून भारतभ्रमणाला निघाले आहेत. या प्रवासादरम्यान नुकतेच ते रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत पोहोचले. त्या वेळी त्यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेचे (कोमसाप) जिल्हाध्यक्ष आणि निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. ‘कोमसाप’ आणि निवेदिता प्रतिष्ठानतर्फे गंधार कुलकर्णी यांचे भेटवस्तू आणि शुभेच्छापत्र देऊन स्वागत करण्यात आले. तसेच भारतभ्रमण यशस्वी होण्याकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.

मातृभाषांच्या अभ्यासाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यासाठी देशाच्या सर्व राज्यांत जाऊन अभ्यास करण्याचा या दौऱ्याचा उद्देश असल्याचे गंधार यांनी सांगितले. एक जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथून त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. आतापर्यंत ७९०० किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला असून, दहा राज्यांच्या भाषांचा अभ्यास केला आहे. 

गंधार कुलकर्णी यांचे स्वागत करताना प्रशांत परांजपेमध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, चंडीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब, गुजरात असा प्रवास करून ते आता महाराष्ट्रातून पुढे गोव्याकडे रवाना होणार आहेत. गुहागर येथील वेळणेश्वरला जाऊन तीन दिवस रत्नागिरीत थांबून नंतर पुढील प्रवासाला रवाना होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. एकूण वीस हजार किलोमीटरचा सायकल प्रवास करून ऑगस्ट २०१९पर्यंत भारतभ्रमण पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

या दौऱ्यासाठी एसबीआय आणि पितांबरी यांनी थोडे सहकार्य केले असून, मंत्री विनोद तावडे यांनी शुभेच्छापत्र दिल्याचे गंधार यांनी सांगितले. आतापर्यंतच्या दहा राज्यांच्या प्रवासादरम्यान नोंदवलेल्या निरीक्षणांच्या आधारे त्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातच मातृभाषेबद्दल जास्त जागरूकता असल्याचे आढळून आल्याचे गंधार यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZMNBU
Similar Posts
कचरा नव्हे, ही तर संपत्ती! रत्नागिरी : कचऱ्याचा प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे उग्र रूप धारण करतो आहे. त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली न जाणे हे त्यामागचे कारण; पण बहुतांश प्रकारच्या कचऱ्याचा पुनर्वापर करता येतो. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील निवेदिता प्रतिष्ठानने हे स्वतःच्या प्रयोगांतून सिद्ध केले आहे. त्यांनी
नव्या पिढीने गिरवले जलसाक्षरतेचे धडे दापोली : रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील निवेदिता प्रतिष्ठानने बालदोस्तांसाठी नुकतेच धम्माल शिबिर आयोजित केले होते. यात केवळ धमाल न करता प्रतिष्ठानतर्फे देशाच्या या भावी जबाबदार नागरिकांना जलसाक्षरतेचे धडे देण्यात आले. पाणी हा विषय किती महत्त्वाचा आहे आणि जलस्रोतांचे संरक्षण व संवर्धन किती
धम्माल शिबिरात मुलांनी अनुभवली बिनभिंतीची शाळा दापोली : तालुक्यातील जालगाव येथील निवेदिता प्रतिष्ठानतर्फे दिवाळीच्या सुट्टीमध्ये आम्रपालीच्या आमराईत दोन दिवसीय धम्माल शिबिर घेण्यात आले. या शिबिरात मुलांनी वेगवेगळ्या विषयांची माहिती घेऊन बिनभिंतीच्या शाळेचा अनुभव घेतला.
निवेदिता प्रतिष्ठानतर्फे इको-फ्रेंडली गुढीची निर्मिती दापोली : गुढीपाडव्यानिमित्त दापोलीतील निवेदिता प्रतिष्ठानतर्फे पर्यावरणपूरक (इको-फ्रेंडली) गुढीची निर्मिती करण्यात आली आहे. गुढी उभारण्यासाठी दर वर्षी बांबूची मोठ्या प्रमाणावर तोड केली जाते. हे प्रमाण कमी व्हावे यासाठी या वर्षी पर्यावरणपूरक गुढीचा लक्षवेधी प्रकल्प ‘निवेदिता’मार्फत हाती घेण्यात आला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language